स्वाईन फ्लू (H1N1)

स्वाईन फ्लू हा सध्या काही आठवड्यात मोठा चर्चेचा व चिंतेचा विषय बनला आहे. हा आजार मनुष्यामधे तिव्र श्वसनाच्या अनेक लक्षणांसह आढळतो. नुकत्याच मॅक्सिकोने केलेल्या परिक्षणात नवीन स्वाईन A (H1N1) विषाणूची नोंद करण्यात आली.

स्वाईन फ्लूचा विषाणू हवेत आठ तास जिवंत राहू शकतो. स्वाइन फ्लू विषाणू बाधित व्यक्तीच्या खोकण्याने किंवा शिंकण्याने हवेत उडणा-या तुषारातील विषाणू धूलिकणावेष्टीत स्वरुपात जिवंत राहतात. तसेच हे विषाणू खुर्ची, टेबलसारख्या ठिकाणीही जिवंत राहतात. या विषाणूंचा नाक, डोळे, तोंड यासारख्या घ्राणेंद्रियांशी संपर्क झाल्यास विषाणूंचे संक्रमण होते. डुकराचे मटन खाणे व स्वाइन फ्लू यात काहीच संबंध नाही.